गुलमोहरावर पहिली कविता २०१० मध्ये झाली. त्याचाच हा sequel मानावा ! मूळ कविता इथे पहा - तिचे नाव होते एकाकी योगी -ती कविता वाचल्यावर यातील संदर्भ नीट लागतील.
हा स्थितप्रज्ञ पेटुनि अजूनी राही
पर त्याला याचा आठव येतच नाही
तो बरसून गेला वसंत समयी जेव्हा
केशरी सडा मग पडला होता तेव्हा
परि गुलमोहर ना रुसला वर्षावाने
योगी कैसा हा बधेल त्या बदलाने
तप पुष्पांचे हे अविरत चालू राही
ही समस्त सृष्टी त्याची वाटच पाही
ही तृषार्त धरणी करते अशी प्रतीक्षा
तो पाउस घेतो भलती कठीण परीक्षा
जोवरी न येई सोसाट्याचा वारा
ना गर्जती घन, ना धो धो धो धो धारा
तप-तत्पर तोवर धैर्याने राहणे
कर्तव्या अधिकच निष्ठेने पाहणे
तोवरी धन्यता नाही तप्ततनूला
मूर्तिमंत धीरा दावीतसे जगताला
आसमंत-कोपातही न सोडी कर्म
योगिया-व्रताचे असे हेच ते मर्म
खाउन जरी भरपेट असा तो राही
ReplyDeleteपरी त्याला याचा आठव येतच नाही
तो खाउन गेला दुपार समयी जेव्हा
शित-भात-सडा मग पडला होता तेव्हा
परी ढब्बू ढोल भुकेला व्याकुळतेने,
स्याटीसफ्याक्षन कैसे त्या अन्नाने!
तप खादाडीचे अविरत चालू राही
तो केल्या सैपाकाची वाटच लावी
हे पोट भरावे कधी असली प्रतीक्षा
ती भूक घेतसे भलती कठीण परीक्षा
जोवरी न येतील मुंग्या सर्वांगाला
ना भांडी करिती ध्वनी तो खड्खडणारा
जणू आरामात तोवरी खात राहणे
मिरच्या-मीठही भुरक्या मारत खाणे!
तोवरी शांतता नाही त्या पोटाला
उदरभरण ते भार परी जगताला
उपवास असो तरी खाणे - एकच कर्म
वाढत्या ढेरिचे कळले का रे मर्म?