Saturday, November 26, 2011

mak says it मधूक्ती

  • रागदारी / शास्त्रीय संगीत आणि उमेश व गिरीश कुलकर्णी चे चित्रपट (आणि fab -इंडिया / खादी चे कपडे) यात काय साम्य ....
  1. या गोष्टींची किंमत फार थोड्या लोकाना कळते
  2. यात प्रत्यक्ष कलाकार ( उपभोक्ते ) याना श्रोते (पाहणारे) यांच्यापेक्षा दसपट आनंद मिळतो :प
  • एखादी कलाकृती "उच्च" पातळीवरचा आनंद देते म्हणजे काय ... 
  1. ती गोष्ट आपल्या डोक्यातून काही केल्या जात नाही.
  2. आपण त्यावरच विचार करत बसतो ... आणि मग एखाद्या गणिती कोड्याचं उत्तर एकदम सापडावं तद्वतच आपल्याला त्या कलाकृतीतली गोम समजावी " अरेच्चा हे असं आहे होय" असं वाटावं ... त्यावेळी मिळतो तो आनंद समाधान ... केवळ अवर्णनीय  
  • रेल्वेचा प्रवास आरामदायी की बसचा ... रेल्वेचाच ; अर्थात! ... पण रेल्वे गाठेपर्यंतच्या प्रवासाचं काय ... मुळात गाडी लवकर मिळावी म्हणून जीवाचा आटापिटा, मग आपली गाडी नेमकी कुठल्या फलाटावर येणार ? ... ती गाठेपर्यंत आपण हमखास २ -३ जिने उतरतो / चढतो... म्हणून रेल्वेचा प्रवास आरामदायी .. पण बस गाठणं सोपं रेल्वे गाठणं नव्हे 
  • आपल्याला खरच कुठल्या गोष्टीची गरज असते ... कितीही मिळाली तरी पुरी पडत नाही अशी कुठली गोष्ट ? एकच  आणि ती म्हणजे वेळ 
  • सुंदर मुलीकडे पाहिल्यावर आपल्याला आनंद होतो हे खरय; पण त्याहून अधिक आनंद कधी मिळतो ?? आपण चुकून नजर फिरवावी आणि सुंदर मुलगी आपल्याकडे पाहत आहे याची जाणीव व्हावी!!!
  •  चालवणे  हा शब्द  इथे हत्यार चालवणे किंवा सुरा चालवणे असा वापरायचा आहे .... पुलंचं हे वाक्य तर आपल्याला अगदी पाठ आहे . पण हे  चालवणं फार महत्वाचं आहे . मी एखादी गाडी चालवतो तसं  मी माझ्या दिवस चालवू शकतो का  म्हणजे मला हवं  तसं  मी त्या दिवसात वागू शकतो का ? इंग्लिश मध्ये या अर्थी to drive असं क्रियापद आहे . तेव्हा तुम्हाला तुमच्या सवयी , दिवस, वेळ आणि नशीब चालवता येतं का ? असेल तर तुम्ही आयुष्याचे तरबेज चालक झालात ! 
  • ओदनं नास्ति तर्हि भोजनं नास्ति !
 (...वपुर्झा वरून सुचलेली शैली आणि सैरावैरा धावणार्या मनात येणारे काही विचार ..)