Showing posts with label पावसाळा. Show all posts
Showing posts with label पावसाळा. Show all posts

Wednesday, July 2, 2014

व्रत योगियाचे


गुलमोहरावर पहिली कविता २०१० मध्ये झाली. त्याचाच हा sequel मानावा ! मूळ कविता इथे पहा - तिचे नाव होते एकाकी योगी -ती कविता वाचल्यावर यातील संदर्भ नीट लागतील.

हा स्थितप्रज्ञ पेटुनि अजूनी राही
पर त्याला याचा आठव येतच नाही

तो बरसून गेला वसंत समयी जेव्हा
केशरी सडा मग पडला होता तेव्हा

परि गुलमोहर ना रुसला वर्षावाने
योगी कैसा हा बधेल त्या बदलाने

तप पुष्पांचे हे अविरत चालू राही
ही समस्त सृष्टी त्याची वाटच पाही


ही तृषार्त धरणी करते अशी प्रतीक्षा
तो पाउस घेतो भलती कठीण परीक्षा


जोवरी न येई सोसाट्याचा वारा
ना गर्जती घन, ना धो धो धो धो धारा

तप-तत्पर तोवर धैर्याने राहणे
कर्तव्या अधिकच निष्ठेने पाहणे

तोवरी धन्यता नाही तप्ततनूला
मूर्तिमंत धीरा दावीतसे जगताला

आसमंत-कोपातही न सोडी कर्म
योगिया-व्रताचे असे हेच ते मर्म













Thursday, May 27, 2010

नको पावसाळया

नको पावसाळया अंत आता पाहू
घाम हा सारखा येत आहे !
तप्त भट्टीमाजि भाजून निघावे
मजलागी तैसा "ताप" देवा ;
तुजवीण "गार" ना दुजे त्रिभुवनी
धाव हो जननी वर्षा-आई!
'घाम-घाम-घामे'; पूर्ण शुष्क झालो ,
चिंब न्हाउ दे रे मानवास |

(मूळ काव्य :
नको देवराया अंत आता पाहू... --संत कान्होपात्रा
http://www.aathavanitli-gani.com/Print%20Html/216.htm)