Thursday, June 11, 2009

चातकांतर

रे रे चातक सावधानमनसा मित्रं क्षणं श्रूयताम् ।
अम्भोदा: बहवो वसन्ति गगने सर्वेऽपि नैकादृशा: ॥
केचिद्वृष्टिभिराद्र्यन्ति धरणिं गर्जन्ति केचिद्वृथा ।
यं यं पश्यसि तस्य तस्य पुरतो मा ब्रूहि दीनं वचः ॥
-भर्तृहरि
मित्र चातका, थांब क्षणभरि, ऐक बोलणे माझे
हर एका मेघास विनविणे हे तुजला साजे;
समान नसति सर्व जाण पा , मेघ बहू दिसती जे
आर्द्रावती कुणी क्वचित् धरेला, गर्जति बाकि वृथा ते !

हा भर्तृहरिच्या काळातला चातक आजही वर्षेच्या आगमनाकडे डोळे लावून बसला आहे.
पण आज मात्र त्याला वेगळी प्रार्थना करावी लागेल. कारण त्या वेळच्या व आजच्या चातकामध्ये थोडे अंतर तर आहेच ना !

रे रे चातक सावधानमनसा मित्रं क्षणं श्रूयताम् ।
अम्भोदा: बहवो वसन्ति गगने सर्वेऽपि ते वञ्चका: ॥
भुवनेऽस्मिन् मनुशोषिते दूषिते वर्षाऽपि रुष्टा खलु ।
प्रार्थय मानवं , स्वमंत्रितं भूपतिं तेनैव एतद्कृतम् ॥

रे रे चातक सावधान बनुनि ऐक माझे जरासे
ना कोणा मेघास आज विनवू सर्वेच फसवे असे ;
वर्षाही रुसली मनुष्यजगति या शोषणे दूषणे
कर्ता मानव, त्यास जा विनव, जो राजा स्वतःला म्हणे !5 comments:

 1. सही आहेस अरे तूऽऽऽ

  ReplyDelete
 2. looks great although i understood very little...keep up the good work

  ReplyDelete
 3. This comment has been removed by a blog administrator.

  ReplyDelete
 4. shewatche marathitil kadwe kalale!
  khoopach marmik ahe!
  bakiche dokyawarun gele!
  kalawe!

  ReplyDelete