Tuesday, December 24, 2013

सिग्नल तोडा रे , नियमा मोडा रे !

(गदिमा व बाबूजी क्षमस्व मां)

सिग्नल तोडा रे , नियमा मोडा रे  !
सिग्नल तोडा रे झडकरी ! सिग्नल तोडा रे झडकरी !सिग्नल तोडा रे झडकरी !
||पुणेरी ट्रॅफिक की हो जय ||

पी एम पी च्या गाड्या पळती,
गजांग! तरीही पुढे निसटती
फिकीर नाही अवती-भवती
कोणी असे वा नसे काय ते , चला चला सत्वरी !

कसला पिवळा, लालही कसला
थांबे जो - तो तिथेच फसला
चौका मध्ये घुसूया चला
अर्जंटाची इमर्जन्सी ही असेच हो न्यारी !!

वाहन गर्दी अशीच जमता
इंच इंच ते पुढे सरकता
पायी चालल्या पथिकाकरिता
जागा नुरली कशास यावे त्याने रस्त्यावरी !

बाईक येथे सहज लाभली
कोटी कोटी "धूम" उपजली
कुठला वन-वे शिस्तही कुठली ?
नियमावली पाळायासाठी जावा नगरांतरी !!

मामाने जरी मध्ये पकडता
चिरीमिरी द्या, घ्या पाय काढता
सावधान हो! पार्किंग करता !
त्या गुन्ह्याते , फटका मोठा चारशे - पाचशे वरी !!

गर्जा गर्जा हे पुणेरीगण
भाई दादा सगळे आपण
सगळे आपण भलते सज्जन !!
अक्कल नसते केवळ येथे इतरांच्या हो शिरी !!

बाणा असतो खास पुण्याचा
विशाल हेतू याच कलेचा
महिमा कळतो मग स्पर्धेचा
पाहती मग उल्लंघ-कार्य हे स्तब्ध दिशा चारी !!


धुरासोबती पिटवा डंका (बर का ! बर का !! बर का !!!)
पुणेकराचा धर्म ओळखा
पाळी जो नियमास त्या फुका
इथली माती अद्दल घडवी मारी फाट्यावरी !!


इथे क्लिक करून गाणे ऐका !

चाल - सेतू बांधा रे

पुणेरी रहदारीवरून प्रेरित.  

सूचना -

पुण्याचा रहदारीचे हे वर्णन केवळ मजेत केलेले आहे.

हे वाचताना डोके फार "चालवून", मनाला लावून घेऊ नये.

-हुकुमावरून

5 comments:

  1. Did not like the footnote... :-/

    This needs to be taken seriously, and you need not care if people get offended, kyun ki tu sahi bol rahaa hai...

    ReplyDelete
  2. hahaha. best. parva nustich vachli hoti. aaj recording aikla. te masta ahe. chhan mhanla ahes :)

    ReplyDelete
  3. beshhta jamaliye bhatti.. hapisat basalya basalya feel ala swargate chya chaukacha!

    ReplyDelete
  4. besht jamaliye kavita! mast yamak ani hubehub varnan! hapisat basalya basalya feel ala Swargate chya chaukacha!

    ReplyDelete