Sunday, May 10, 2009

केल्याने भाषांतर

आरम्भगुर्वी क्षयिणी क्रमेण लघ्वी पुरा वृद्धीमती च पश्चात् |
दिनस्य पूर्वार्धपरार्धभिन्ना छायेव मैत्री खलसज्जनानाम् ||

आरंभी असली महत्तर जरि आटे तयानंतरी 
आरंभी लघु भासली तरि क्रमे पावेल वृद्धी बरी ;
ही छाय़ा दिसते अम्हास दिवसाच्या पूर्व अन् उत्तरी
तैशी मैत्री ही दुष्ट-सज्जन करी हे जाण तू अंतरी .

Shadows guise through the day,
I wonder what they say;
From larger shapes they shrink, and from tiny they elongate;
thats how the company developes, of a crooked and a naive mate!

(दिवसाच्या पूर्वार्ध आणि उत्तरार्धात जशी सावली असते, त्याची उपमा इथे मैत्रीला दिली आहे. संधीसाधू दुष्ट माणसांची मैत्री ही आधी मोठी आणि नंतर लहान होत जाते. पण सज्जनांची मैत्री कशी उत्तरोत्तर वाढत जाते. आपली संस्कृत भाषा मला आवडते ती, कमीत कमी शब्दात आपलं म्हणणं मांडणाऱ्य़ा या अशा पद्यांमुळेच ! )

1 comment:

  1. mashaah allaah!!! subahaan allah! wah wah!!! apratim!

    (bas na?)

    pan seriously, nice pick!! ani hya veli tu don bhashaant translate kelays!!! sahiyye boss!

    ReplyDelete