
असं म्हणतात की शिळोप्याच्या गप्पा मारल्या की ताजंतवानं वाटतं ,
गप्पाच कशाला गेलेला एखादा विनोदी क्षण आठवला की आपण एकटेच वेड्यागत हसतो नाही का?
पण एखादा निःश्वास टाकत खिन्न हसायला लावणारे क्षणही येतात कधीकधी आठवणींमध्ये,
आपल्या आत डोकावलं की असे अनेक क्षण आपल्याला भेटतात ;
आणि कधीकधी ह्या शिळोप्याच्या गोष्टी मारुतीच्या शेपटीप्रमाणे लांबतच जातात , न थांबता ......
बय्राचदा ध्यान करताना असंच काहीसं होतं आणि आठवणींचं जाळं इतकं झालं होतं हे आपल्याला कळतं,
असं होऊन गेलं की कसं मोकळं झाल्यासारखं वाटतं...
घरातल्या वस्तू आवरून ठेवल्यावर वाटतं तसं;
एवढा सगला कळूनही आपण कोळीष्टक जमवत बसतो,
आपल्या आयुष्याची नि मनाची गम्मत अशी की हे सगळं वारंवार होतं.
उपाय दोन :
ह्या आशा वातावरणापासून दूर जा;
किंवा जाळीच अशी विणा की सुंदर, देखणी होतील
ह्यालाच अनुक्रमे, कदाचित वानप्रस्थाश्रम नि कर्मयोग म्हणतात !!!
