अर्थात, शास्त्राविषयीचा सिद्धांत
अहो किमिति चित्रम् तु शास्त्राणाम् रचना खलु
पश्येदं शास्त्र सर्वत्र गणितेन परिपूरितम् ।
गणितमस्ति मूलम् वा कार्यकारणभावना
मन्येहं तत्रैकत्वम् तेजोष्णयोर्यथाऽऽतपे ॥
किती शास्त्रवैचित्र्य असते पहा हे ।
जणू सर्व विज्ञान गणितात राहे ॥
तरी कार्य त्या कारणे भाव कैसा ?
वसे तेजऊष्मा रवीदीप्ति जैसा ॥
(अहाहा !! माझ्या मनातील कोड्याला मी असा देववाणीतून सांगेन अशी कल्पना मलाही नव्हती!! )
तर हा प्रश्न आहे गणित आणि शास्त्राचा !! शास्त्रातील कोणताही सिद्धांत गणिताशिवाय अपूर्ण असतो. पण तरिहीएखाद्या सिद्धांतामागील " तत्व " गणिताशिवाय समजू शकते. किंबहुना ते तसे समजले तरच ती गोष्ट संपूर्णसमजते. English मध्ये याला intuitive understanding असं म्हणतात!!
पण गणित आणि हे "समजणं " एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत नाही का? जसं ऊन्हामध्ये तेज, प्रकाश आणिउष्णता सदैव एकत्र असतात तसंच!!