शाळेमधल्या बाल जीवनी
उचलली मी प्रथम लेखणी ||
कथा काव्य नाटके नि गाणी
रेखांकन चित्रांकन आणि;
कला आवडे मजला सुंदर
शास्त्रदेशी जरि बहुधा वावर
आश्चर्याने पहा समोरी
निर्मात्याची आविष्करणे;
सुंदर पुष्पांनाही दिधले
केवळ एक दिनाचे जगणे
मनुष्य मात्राचीही बुद्धी
आश्चर्याचे अमोल लेणे;
शास्त्राद्वारे ग्रहताऱ्यांना
देखील पादाक्रांती करणे
विश्लेषित या आश्चर्याला
सुचते जे जे मजला अक्षर;
ते ते वाचू शकता येथे
निमंत्रण तुम्हा देतो सत्वर
किंचित थांबा येथे वाचून
"comments" टाका थोडे चिंतून;
माझे म्हणणे नाही अंतिम
आहे मी हे नित्य ओळखून
दीपावलीच्या सुमुहूर्तावर
मी आलो या blog-जगावर;
शुभइच्छा स्वीकारा माझ्या
लोभ असू द्या मकरंदावर