"But it's not who you are underneath, it's what you do that defines you."
संदर्भ - प्रस्तुत वाक्य ख्रिस्तोफर नोलान दिग्दर्शित Batman Begins या चित्रपटातील आहे. ब्रूस वेन याची प्रेमिका कु. रेचल हे वाक्य ब्रूसला उद्देशून म्हणते. अनेक वर्षानी ब्रूस तिला काही सुंदर ललनांसोबत भेटतो, एका हॉटेलात. एकमेकांच्या डोळ्यात पाहून तेव्हा बालपणीचे वात्सल्य, आताची तीव्र आंतरिक ओढ आणि तरीही असहायता असे भाव दाटून येतात. त्यामुळे ब्रूस तिला सांगण्याचा प्रयत्न करतो की मी हा जो बोलतो -वागतो आहे तसा मी नाहीये. Inside, I am more! त्यावर रेचल हे वाक्य बोलते.
स्पष्टीकरण - तुम्ही काय करता त्यावरूनच तुमची परीक्षा होते, तुमच्या मनात काय भाव आहेत ते कोणी तपासत नाही. जीवनातील एक अमूल्य तत्वज्ञान इथे विषद केले आहे. ब्रूस मनातून कितीही चांगला असो, तो असा उनाडपणे उघड्या नागड्या पोरींसोबत हिंडल्यावर रेचालला असे वाटणे तसे स्वाभाविक आहे. परंतु या वाक्यातून हेही प्रतीत होते की मुली या बाह्य रूप-कृतीवरच अनुमान काढून मोकळ्या होतात. त्यामागे काय कारण असू शकते याचा साधा विचारही त्या करीत नाहीत. याला असमंजसपणा म्हणतात.
पण तरीही आचरणासाठी मार्गदर्शक ठरेल असा विचार श्री नोलान इथे मांडतात यात शंकाच नाही. आपल्या चित्रपटात क्षणोक्षणी आणि जागोजागी असे विचार पेरणे, हा नोलान यांचा छंदच आहे - आणि त्यामुळेच ते चित्रपट लोकांच्या मनात घर करून राहतात.