पेटले कुठेसे पाणी
त्यासाठी जळते मत्ता |
एन्-नम्मा मोडून भांडून
जन संगती त्यावर सत्ता 👿 ||
पेटल्या कुठेशा जाती
जन लाख लाख एकत्र
आग्रही शांत वा तप्त
हे आरक्षणार्थ सत्र ☹️!!
कुणी यादव तो नाराज
खो खो खुर्चीचा चाले
कुणी खुनी मोकळा होई
कायदा कुणाला तोले? 😱
धास्ती सीमेपलीकडची
वित्त-प्राण-संयम नेई 💀
अश्रूंच्या लाटेमधुनी
प्रतिशोध धुमसता राही 😠
चहूबाजू हा डोंगर तो
संकटेच भरूनी येती
परी जन ना थांबत तेथे
प्रज्ञास्थित पुढेच जाती 🌝
ऐशाच अनोख्या देशी
घनगगनालाही गवसणी
ग्रह अंतराळी भरारे
नवविक्रम दावी तुफानी !!
💫
💫
(photo taken from: google images)
(एन्-नम्मा - माझे माझे )
कविताशैलीचे प्रेरणास्थान :P :D - प्रसाद साळवी
(एन्-नम्मा - माझे माझे )
कविताशैलीचे प्रेरणास्थान :P :D - प्रसाद साळवी