तो गातो - कारण नाही
ती गाते - कारण नाही
कुणी चित्र असे रेखाटे
जणू सजीव आहे वाटे
त्या रंग-आकृत्यां मधुनी
आगळाच गंधहि भेटे
असेच का घडले चित्र
त्यालाही कारण नाही !
कुणी काव्य करी नेटके
कुणी त्यातून मारी फटके
कुणी निव्वळ सौंदर्याला
पूजतो त्यात नेमके
पण असेच का ते झाले
ना त्याला कारण काही!
छिन्नीचा पहिला घाव
त्या पाषाणा निर्जीव
तो प्राण त्यामधी ओते
दगडाचा होतो देव
पण तीच आकृती का रे
कारण ना तयात पाही !
शहराची सुंदर रचना
मनोरम भवने नाना
कुणी वास्तुशिल्पी तो तज्ज्ञ
मन मोही ती कल्पना
पण ऐसेच का बरे आहे
त्या उत्तर मिळणे नाही !
गाणे असते स्वच्छंदी
जरी राग तयासी बांधी
परी कर्तृत्त्वास कलेच्या
नसते कारण-तट-बंदी
तो गातो - कारण नाही
ती गाते - कारण नाही
ती गाते - कारण नाही
कुणी चित्र असे रेखाटे
जणू सजीव आहे वाटे
त्या रंग-आकृत्यां मधुनी
आगळाच गंधहि भेटे
असेच का घडले चित्र
त्यालाही कारण नाही !
कुणी काव्य करी नेटके
कुणी त्यातून मारी फटके
कुणी निव्वळ सौंदर्याला
पूजतो त्यात नेमके
पण असेच का ते झाले
ना त्याला कारण काही!
छिन्नीचा पहिला घाव
त्या पाषाणा निर्जीव
तो प्राण त्यामधी ओते
दगडाचा होतो देव
पण तीच आकृती का रे
कारण ना तयात पाही !
शहराची सुंदर रचना
मनोरम भवने नाना
कुणी वास्तुशिल्पी तो तज्ज्ञ
मन मोही ती कल्पना
पण ऐसेच का बरे आहे
त्या उत्तर मिळणे नाही !
गाणे असते स्वच्छंदी
जरी राग तयासी बांधी
परी कर्तृत्त्वास कलेच्या
नसते कारण-तट-बंदी
तो गातो - कारण नाही
ती गाते - कारण नाही