- रागदारी / शास्त्रीय संगीत आणि उमेश व गिरीश कुलकर्णी चे चित्रपट (आणि fab -इंडिया / खादी चे कपडे) यात काय साम्य ....
- या गोष्टींची किंमत फार थोड्या लोकाना कळते
- यात प्रत्यक्ष कलाकार ( उपभोक्ते ) याना श्रोते (पाहणारे) यांच्यापेक्षा दसपट आनंद मिळतो :प
- एखादी कलाकृती "उच्च" पातळीवरचा आनंद देते म्हणजे काय ...
- ती गोष्ट आपल्या डोक्यातून काही केल्या जात नाही.
- आपण
त्यावरच विचार करत बसतो ... आणि मग एखाद्या गणिती कोड्याचं उत्तर एकदम
सापडावं तद्वतच आपल्याला त्या कलाकृतीतली गोम समजावी " अरेच्चा हे असं आहे
होय" असं वाटावं ... त्यावेळी मिळतो तो आनंद समाधान ... केवळ अवर्णनीय
- रेल्वेचा
प्रवास आरामदायी की बसचा ... रेल्वेचाच ; अर्थात! ... पण रेल्वे
गाठेपर्यंतच्या प्रवासाचं काय ... मुळात गाडी लवकर मिळावी म्हणून जीवाचा
आटापिटा, मग आपली गाडी नेमकी कुठल्या फलाटावर येणार ? ... ती गाठेपर्यंत आपण हमखास २ -३ जिने उतरतो / चढतो... म्हणून रेल्वेचा प्रवास आरामदायी .. पण बस गाठणं सोपं रेल्वे गाठणं नव्हे
- आपल्याला खरच कुठल्या गोष्टीची गरज असते ... कितीही मिळाली तरी पुरी पडत नाही अशी कुठली गोष्ट ? एकच आणि ती म्हणजे वेळ
- सुंदर
मुलीकडे पाहिल्यावर आपल्याला आनंद होतो हे खरय; पण त्याहून अधिक आनंद कधी
मिळतो ?? आपण चुकून नजर फिरवावी आणि सुंदर मुलगी आपल्याकडे पाहत आहे याची
जाणीव व्हावी!!!
- चालवणे हा शब्द इथे हत्यार चालवणे किंवा सुरा चालवणे असा वापरायचा आहे .... पुलंचं हे वाक्य तर आपल्याला अगदी पाठ आहे . पण हे चालवणं फार महत्वाचं आहे . मी एखादी गाडी चालवतो तसं मी माझ्या दिवस चालवू शकतो का म्हणजे मला हवं तसं मी त्या दिवसात वागू शकतो का ? इंग्लिश मध्ये या अर्थी to drive असं क्रियापद आहे . तेव्हा तुम्हाला तुमच्या सवयी , दिवस, वेळ आणि नशीब चालवता येतं का ? असेल तर तुम्ही आयुष्याचे तरबेज चालक झालात !
- ओदनं नास्ति तर्हि भोजनं नास्ति !
(...वपुर्झा वरून सुचलेली शैली आणि सैरावैरा धावणार्या मनात येणारे काही विचार ..)