जुनी गाणी ऐकू लागलो
जुने पिक्चर बघू लागलो
तेच आता आवडलंय
अस वाटत मी काहीतरी निवडलंय
नाहीतर काय अल्गो निवडतंय
तुला घडवतय बिघडवतंय !
मग दाखवेल ते एखादा विनोद
किंवा एखादी छान सुंदरी
हुरळू नको;(!) ती बहुधा नसेल खरी !
अल्गो नसेल तर दुसऱ्या साखळ्या
बांधून घेतल्या आहेत मी सगळया
व्हाटस अपवर आहेत कित्येक गट
आहेत माझ्या बुद्धीचे तट
किंवा इन्स्टाच क्षणिक रीळ
नका देऊ फार बुद्धीला पीळ
काय म्हणता, "याला कसं कळलं ?
"माझच जणू आयुष्य या मीम मध्ये कस दिसल "
हो, पण बघून तुझं दुःख नाही का विरलं!?
आणि समजा नसेल तस सुद्धा, तर आहेतच -
मुलाखती, गप्पा, आणि पॉडकास्ट
नाही, ते जरा बरे असतात
काही तरी खरे भासतात
थोडा विरंगुळा, थोडा उपदेश
आणि काहीच नाही तर गुंगवून झोपवतात पण
अहो पण अती झालं काही, कि येताच ना दडपण !
असो, म्हणून मग वाटत एखादा जुना पिक्चर बघू
जेव्हा ऑफिसात गेलं की घरातला मेसेज नाही
आणि घरी आल की ऑफिसची पिरपिर नाही
जेव्हा काम तेव्हा काम
जेव्हा आराम तेव्हा आराम
जेव्हा गाणं तेव्हा गाणं
जेव्हा खाणं तेव्हा खाणं
जेव्हा आराम तेव्हा आराम
जेव्हा गाणं तेव्हा गाणं
जेव्हा खाणं तेव्हा खाणं
हळू हळू असेल ते जगणं
एका वेळी एकच व्याप
जागतिक युद्धांचा नाही डोक्याला ताप
म्हणून लावतो जुनी गाणी
फुरसत के रात दिन म्हणणारी
किंवा मंद झाल्या तारकांना आठवणारी
किंवा साध्या फोनवरून बोलणारे जुन्या पिक्चरमधले ते लोक
नवीन गाणी नवे पिक्चर - ते पण बघतोच कि आपण
पण जुन्या गोष्टीत, जुन्या गाण्यात असते -
एका वेळी एकच गोष्ट करणाऱ्या माणसांची आठवण !