Sunday, November 28, 2010

केल्याने (हिंदी) भाषांतर

"Don't think of others because they don't do it often!"
हे वाक्य GoogleBuzz वर वाचून मला आठवलं ते पुढील सुभाषित

ददतु ददतु गालिर्गालिवन्तो भवन्तो
वयमपि तदभावाद्गालिदानेSसमर्था: |
जगति विदितमेतत दीयते विद्यमानम्
न हि शशकविषाणं कोSपि कस्मै ददाति ||
-भर्तृहरि (वैराग्यशतक)
पण मग एकाला त्याचा अर्थ कळेना म्हणून मग हे रूपांतर!
जितनी चाहे गाली दो तुम, हम ना कभी कुछ बोलेंगे ,
तुम तो ठहरे गालीवान तो, और भला तुम क्या दोगे ;
खरहेके ना सींग कभी कोई, दान करेगा जी किसीको
जो है अपने पास वही तो, देता प्राणी दुनियाको !


अमिताभच्या आवाजात मधुशाला ऐकली होती (http://www.youtube.com/watch?v=FO_2Ypeq6KM). त्याचा प्रभाव होता म्हणून त्या चालीत बसेल असं लिहिलंय.

English:
Oh, friend curse me, curse me, curse me, .... as long as you wish,
I don't have any curses , so I cannot give them!
It is well-known that "you can donate only if you possess it!"
No one can give hare-horns to anybody!

याची सुरुवात कार्थिकच्या buzz पासून झाली; त्याला धन्यवाद !

Monday, November 8, 2010

दीपावली शुभाशयाः

आम्रः फलेषु मयूरः खगेषु
यथा सिंहः वनश्वापदेषु
चिरं निधानं प्रकाशहर्षस्य
तथैव दीपोत्सव उत्सवेषु ।।

As mango is the king amongst all fruits, as peacock is the king of all birds and king of all animals is the lion;
So is the Deepawali-king of all festivals, and the permanent source of joyous light (and resplendent joy!).




Sunday, September 26, 2010

एकाकी योगी

पालवी वसंते आता तर फुलली होती
आता कोठे ही हिरवाई भरली होती

तेव्हाच येतसे भाजत चराचराला
या धरणीवरती चंडरश्मीचा घाला

पेटला असे एकटा खडा मध्यान्ही
वरती खाली हा असे तप्त जणू वन्ही

पांथस्थ जातसे श्रांतशा तनामनाने
त्या उग्र दुपारी जी रणरणते ग्रीष्माने

सावलीच पुष्कळ देणारे भेटले
उधळून गंध तो छळणारे भेटले

तो केवळ त्याच्या तेजाने बोलतो
आरक्त फुलांनी नयनांना वेधतो

पांथस्थ पाहतो मान उचलुनी जेव्हा
मंद मलूल गळलेले समस्त तेव्हा

तो मात्र धीरसा उभा ठाकला आहे
जणू व्रतस्थ योगी तेजाने 'तप'तो आहे

लेवुनी फुले केशरी पिवळी वा रक्त
तेजाने तळपे अनलाचा हा भक्त

एकेक पुष्प देखणे फारसे नाही
ना सुगंध-अस्त्रे मोहवते ते काही

हिरव्या तरुगुच्छे पुष्प शोभती खास
हा तू देतसे भेट अशी अवनीस
....

वर्षानांदीस्तव सोसाट्याचा वारा
घन गर्जतील अन धो धो धो धो धारा

सर्वत्र नवे अंकूर नवा उल्हास
मातीच सुंदर दरवळणारा वास

हर्षोल्लासाने तोही नाचत आहे
ती तप-पुष्पे धरणीला अर्पित आहे

तो गुलमोहर तो झाला पुरता धन्य
धरणी त्याची ती सेवा करते मान्य

एकाकी तपाचे सार्थक येथे झाले
आता विसरो वा स्मरो कोणीही अपुले

पुनश्च तपणे आता ग्रीष्मी आहे
तोवरी समाधी घेउनी हिरवी राहे

समुदायामध्ये पेटती बहु ते पामर
एकटा पेटतो खास असा "गुलमोहर"